GST Masterclass In Marathi

Free Marathi

स्टार्ट अप्स, ई - कॉमर्स पासून, लेखक आणि फ्री लान्सिगपर्यंत कोणत्याही बिझनेसमध्ये GST ची अंमलबजावणी कशी करायची हे डिटेलमध्ये शिका

Course description

केंद्र सरकारने GST ची सुरुवात केल्यानंतर अद्यापही अनेक उद्योजक आणि विशेष करून स्टार्ट अप्सना त्यांच्या व्यवसायात GST ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. GST कायद्यानुसार अनेक उद्योग, व्यवसाय अशा प्रकारचे आहेत ज्यांचा टर्नओव्हर २० लाख रुपये नसतानाही त्यांना GST लागू होणार आहे. विशेष करून ऑनलाईन माध्यमातून वस्तू आणि सेवांची विक्री करणाऱ्या ई - कॉमर्स वेबसाईटना ते प्रत्यक्षात GST च्या कायद्यानुसार ई - कॉमर्स ऑपरेटर या व्याख्येत सुद्धा येत नसल्याची कल्पना नाहीये.

परदेशात राहत असलेले ग्राहक असल्यास किंवा परदेशातून भारतीय बँकिंग प्रणालींचा वापर करून वस्तू अथवा सेवेची विक्री झाल्यास नेमके काय करायचे, कंपोझिशन स्किल मधील विविध नियम कोणते, वस्तू अथवा सेवेची प्रत्यक्ष विक्री न करताही GST कशा प्रकारे लागू होतो, युट्यूब वर व्हिडीओ बनवून अथवा स्वत:च्या ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या व्यक्ती अथवा उद्योग, परदेशातील कंपन्यांसाठी एजेंट म्हणून कार्यरत असणाऱ्या भारतातील व्यक्ती अथवा उद्योग यांना GSTची  कशा प्रकारे अंमलबजावणी करायची आहे याव्यतिरिक्त GST मधील अनेक विशेष नियम आणि तरतुदींची सुद्धा या ऑनलाईन मास्टरलास मध्ये उदाहरणांसहित माहिती दिली आहे.

 

   

What you will learn?

   
     
  • जी एस टी कायदा नेमका काय आहे ?
  • बिझनेसला जीएसटी लागू होतो किंवा नाही, हे कसे ओळखायचे ?
  • रिव्हर्स चार्ज या GST मधील विशेष तरतुदीची पूर्ण माहिती
  • दर महिन्याला, किती रुपये GST भरायचा याचं गणित सोडवायचं कसं
  • जी एस टी ची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची ?
  • छोट्या उद्योजकांसाठी कम्पोझिशन स्कीम
  • Documentation आणि Invoice बाबतचे नियम
   

More related courses