How To Choose Right Career Option To Make Your Career Future Proof

Free Marathi

विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी, गोंधळून न जाता योग्य करिअरची निवड कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणारा विनामूल्य ऑनलाईन कोर्स

Course description

भारतात दर तासाला किमान एक विद्यार्थी आत्महत्या करतो . . .  दर वर्षी हि संख्या हजारोंच्या घरात असते . . . ६० टक्के इंजिनिअर्स हे बेरोजगार आहेत . . .  तर त्यातील केवळ ७ टक्के ग्रॅज्युएट्सकडे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक स्किल्स असतात. या सगळ्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या करिअर ऑप्शनची केलेली निवड !  

आज बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे करिअर्सच्या उत्तम संधी असतानादेखील, विद्यार्थी आणि त्यांचे पालक, हे करिअरचा पर्याय निवडताना अनेक चुकीच्या मापदंडाचा वापर करत “एखादं” करिअर निवडतात आणि मग विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण करण्यापासून नोकरी मिळवण्यापर्यंत सगळीकडे घुसमट होते.

योग्य करिअर नेमकं निवडायचं कसं, या लाखो विदयार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनातील प्रश्नाला योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी हा ऑनलाईन कोर्स सुरु केला आहे. हा कोर्स पूर्णपणे विनामूल्य आहे. करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विविध पर्यायांचा विचार कशा प्रकारे केला पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला या कोर्समधून मिळतील.

हा कोर्स विद्यार्थी आणि पालक दोघेही एकत्र करू शकतील, ज्यामुळे करिअरची निवड करताना दोघानांही एकमेकांशी योग्यरीत्या सुसंवाद करता येईल.

   

What you will learn?

   
     

01 ]  करिअर म्हणजे नेमकं काय ?

 

02 ]  करिअर निवडताना, या पारंपरिक पद्धतीने करिअर निवडू नका

 

03 ] स्वतःसाठी सर्वोत्तम करिअर ऑप्शन निवडताना, कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष दिले पाहिजे

 

04 ]  स्वतःच्या आवडीच्या विषयांत करिअर करायचं कि प्रॅक्टिकल विचार करायचा ?

 

05 ] ऍप्टिट्यूड म्हणजे नेमकं काय ? आणि करिअर निवडताना त्याचा विचार का आणि कसा करायचा ?

 

06 ] करिअर निवडताना, व्यक्तिमत्वाची ( Personality ) त्यात कोणती भूमिका असते ?

 

07 ] स्वतःची आवड, ऍप्टिट्यूड आणि व्यकितमत्व या सर्वांचा एकत्रित विचार करून करिअर कशा प्रकारे निवडता येईल ?

 

08 ] ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे नेमकं काय ?

 

09 ] करिअर निवडताना Out of box ( पारंपरिक चाकोरीबाहेरचा ) विचार कसा करता येऊ शकतो ?

 

10 ] भाजी मार्केट, शेअर मार्केट आणि करिअरची रॅट रेस

 

11 ] तुमचं करिअर फ्युचर रेडी आहे का ?

 

12 ] तुमच्याकडे हि “एकमेव” गोष्ट नसेल तर तुमचं करिअर कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकतं

 

   

More related courses