Course description
विकिपीडियावर लिहू या ! महाजालावर मराठी वाढवू या !
विकीपीडिया हा महाजालावरील ( इंटरनेटवरील ) एक मुक्त ज्ञानकोश आहे. या ज्ञानकोशात कोणालाही, नवीन लेख लिहिता येतो किंवा आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. जगभरातील अनेक भाषांसोबतच विकीपीडिया मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. आज, मराठी विकिपीडियावर ४७२८६ लेख उपलब्ध आहे. या माध्यमातून आज जगभरातील मराठी भाषिकांना विविध विषयांची माहिती मराठी भाषेत सहजरित्या उपलब्ध होते. हे लेख, तुमच्यासारख्याचं अनेक व्यक्तींनी मराठी विकिपीडियावर लिहिले आहेत अथवा संपादित केले आहेत. या मुक्त ज्ञानकोशामध्ये जास्तीत जास्त लोकांनी, त्यांना माहिती असणाऱ्या विषयावर लेखन करावे या उद्देशाने, नवीन लेखकांना यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी हा ऑनलाईन कोर्स सुरु करण्यात आला आहे.
What you will learn?
-
विकिपीडियाचा परिचय
-
विकिपीडियाचे पाच महत्वाचे आधारस्तंभ
-
मराठी विकिपीडियाच्या संकेतस्थळाला ( वेबसाईटला ) भेट कशी द्याल ?
-
विकिपीडियावर तुमचे खाते ( युजर अकाउंट ) कसे सुरु कराल ?
-
मराठी विकिपीडियावर मराठी भाषेत टाईप कसे कराल ?
-
मराठी विकिपीडियावर लिहिण्याची सुरुवात कशी कराल ?
-
मराठी विकिपीडियावर नवीन लेखाचे निर्माण कसे कराल ?
-
लिहिलेला लेख संपादित कसा कराल ?
-
लिहिलेल्या लेखात बाह्य संकेतस्थळांच्या दुवा ( वेबसाईट लिंक्स ) कशा प्रकारे जोडायच्या ?
-
लिहिलेल्या मजकुराला योग्य संदर्भ ( रेफरन्सेस ) कसे जोडायचे ?
-
विकिपीडियावर चर्चा कशी कराल ?
-
लेखामध्ये चित्र ( इमेज / फोटो ) कसे जोडायचे ?
-
चावडी या उपक्रमाचा वापर कसा करायचा ?
-
विकिमीडियाच्या इतर विविध उपक्रमांची माहिती