How To StartUp : Step By Step Online Pre Incubation Course

₹ 4999 Marathi

आयडिया ते फंडिंग या प्रवासासाठी स्टार्ट अप्सना सखोल मार्गदर्शन करणारा, मराठी भाषेतील एकमेव ऑनलाईन प्री - इन्क्युबेशन कोर्स

Course description

स्टार्ट अपची समीकरणं हि पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळी आहेत. मात्र अनेक वेळा यातला फरक नीट लक्षात न आल्याने सुरुवातीच्या टप्प्यात स्टार्ट अप फाउंडर्सकडून अनेक चुका केल्या जातात. भारतातील स्टार्ट अप इको सिस्टम हि पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. स्टार्ट अप विषयातील विविध रिसोर्सेस, कार्यक्रम, इन्क्युबेटर, असलरेटर, लाईव्ह डेमोचे कार्यक्रम, फंडिंग मिळवण्याची प्रोसेस, या सगळ्या गोष्टी आणि या इको सिस्टमकडून नवीन स्टार्ट अप्सला मिळणारे बेनेफिट्स हे सर्व इंग्रजी भाषेत संवाद साधू शकणाऱ्या आणि एका विशिष्ट अशा ठराविक "Elite Class" पर्यंतच उपलब्ध आहे. या "Elite Class" मध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झालेले स्टार्ट अप फाउंडर हे त्यांच्या स्टार्ट अप्स साठी लाखो रुपयांचे फायदे सहज मिळवतात, त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातचं स्टार्ट अप विश्वातील "Key Influencer" असणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा आणि प्रोफेशनल इन्व्हेंस्टर व मेंटॉर्सचा फायदा मिळतो. इंडस्ट्री मधील कनेक्शन हे ओपन होतात, स्टार्ट अप स्केलेबल करण्यासाठी फंडिंग मिळवण्यासाठी योग्य प्रकारे मदत मिळते. 

कदाचित, एखाद्या स्टार्ट अपला मिळालेल्या करोडो रुपयांच्या फंडिंगची बातमी एकूण, तुम्हाला धक्का सुद्धा बसला असेल कि, यार "मी स्वतः याच आयडियावर काम करतोय", "माझं प्रॉडक्ट, यांच्यापेक्षा जास्त चांगलं आहे" , तरीही मला फंडिंग का नाही मिळत ? 

स्टार्ट अप्सला फंडिंग का मिळते, फंडिंग मिळवणारे स्टार्ट अप्स नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, त्यांना या इन्व्हेस्टर मंडळींचे दरवाजे उघडे कसे होतात, त्यांना सकारात्मक प्रतिसाद का मिळतो, फंडिंग मिळवण्यासाठी काय करावे लागते या विषयात आज योग्य मार्गदर्शन मराठी मुलांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. 
आपल्याकडच्या मराठी मुलांना स्टार्ट अपची सुरुवात कशी करावी इथपासून ते फंडिंग पर्यंत कोणत्याच  गोष्टीची [ योग्य ] माहिती नसते. स्टार्ट अपच्या सक्सेस स्टोरीज माहिती असतात, बऱ्याच गोष्टी या इंटरनेटवरून सर्फिंग करून वाचलेल्या असतात, परंतु त्यातून योग्य दिशा मिळत नाही.  त्यामुळे स्टार्ट अपची सुरवात करताना आणि संकल्पना प्रत्यक्ष राबवताना अनेक चुका होतात, भरपूर पैसे खर्च होतात आणि तरीही अपेक्षित रिझल्टस मिळत नाहीत.  बऱ्याच वेळेस, आपण चुकतोय हे कळण्याच्या आधीच गोष्टी हातातून निघालेल्या असतात आणि ते समजेपर्यंत आपला Competitor हा आपल्यापेक्षा भरपूर पुढे गेलेला असतो.

स्टार्ट अप विश्वातील हे, रिसोर्सेस कसे मिळवायचे, स्टार्ट अपची योग्य सुरुवात कशी करायची, लाखो रुपयांचे बेनेफिट्स विनामूल्य कसे मिळवायचे, फंडिंग साठी स्वतः आणि स्वतःच्या स्टार्ट अपला तयार कसं करायचं असा विविध गोष्टींवर मार्गदर्शन या कोर्समधून करण्यात येईल. 
 

भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित, अनुभवी स्टार्ट अप उद्योजकांकडून मार्गदर्शन 

   

What you will learn?

   
     

01] स्टार्ट अपसाठी योग्य बिझनेस आयडिया कोणती ?
02] तुमची बिझनेस आयडिया व्हॅलिडेट कशी कराल ?
03] बिझनेस आयडिया स्टार्ट अपच्या समीकरणांमध्ये कशी बांधायची ?
04] योग्य को फाउंडर कसा निवडायचा ? त्याची खरंच गरज असते का ? 
05] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट म्हणजे नेमकं काय ?
06] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ?
07] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्टची योग्य प्रकारे प्लानिंग कशी करायची ? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा ?
08] डेव्हलपर सोबत योग्य प्रकारे कम्युनिकेश कसे करायचे ? 
09] मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट, मार्केटमध्ये  Launch कसे करायचे ?
10] स्टार्ट अपची योग्य lauch strategy कोणती ? [  फेसबुक, ओला, उबर, ओयो रूम्स यासारखे सर्व मोठे स्टार्ट अप्सनी सुद्धा हीच स्ट्रॅटेजी वापरली होती. हि स्ट्रॅटेजी हा एक प्रकारे नियमच आहे. या स्ट्रॅटजी कडे दुर्लक्ष करणारे स्टार्ट अप्स हे बंद पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते  ] 
11] कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत कसे पोहचायचे ?
12] कमी खर्चात युझर [ संभाव्य ग्राहक ]  कसे मिळवायचे ?
13] साध्या आणि सोप्या ग्रोथ हॅकिंग स्ट्रॅटेजीचा वापर कसा करायचा ? 
14] Bootstrapping म्हणजे नेमकं काय ? त्याची गरज का असते ? पैसे कसे वाचवायचे ?
15] स्टार्ट अप फाउंडर आणि सोशल मीडिया : काय करायचं आणि काय करू नये ?
16] इन्क्युबेटर आणि असलरेटर म्हणजे काय ? त्यांना कधी आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं ? 
17] ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग साठी स्ट्रॅटजी काय असली पाहिजे ?
18] ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग साठी कोणते Tools मोठे स्टार्ट अप वापरतात ? 
19] Pitch Deck कसा तयार करायचा ? [ Including Case Studies ] 
20] Practical Results देणारी " One Liner Strategy " 

 

Bonus 

01 ] लाखो रुपये किंमतीचे विविध ऍडव्हान्स मार्केटिंग Tools, Softwares विनामूल्य कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती आणि त्यासाठी मार्गदर्शन 

02 ] SkillSikho.com साठी मी स्वतः साडेसात लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध बेनेफिट्स कसे मिळवले याची माहिती 

03 ] फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून विनामूल्य कम्युनिटी सपोर्ट 

04] स्किलसीखो च्या स्टार्ट अप विषयातील विविध कार्यक्रमांना सवलतीच्या दरात प्रवेश 

05 ] स्टार्ट अप विश्वातील Key Influencer असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तीची लिस्ट ( सोशल मीडियावरील त्यांच्या अकाउंटची लिस्ट ) 

याव्यतिरिक्त आणखी जे काही करता येणे शक्य असेल ते सर्व . . .  
कारण स्टार्ट अप इको सिस्टममुळे मिळणारे विविध फायदे, सपोर्ट या गोष्टी एक ठराविक "Elite Class" पर्यंत मर्यादित राहायला नकोत. सगळ्यांना संधी मिळायला हवी. 

 

   

More related courses